Wednesday, December 16, 2020

प्रत्येक महिलेला माहिती असावे हे अधिकार.........!!!!!



* मुली - मुलाला  कायदानुसार  समान वारसा हक्क असतो .

*बलात्कार झाल्यास महिला कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवू शकते . याला "झिरो फआयर" म्हणतात
*बलात्कार पीडिता महिला कॉंस्टेबल , पोलीस अधिकार्‍यांना खासगित जबाब देऊ शकते.

* बलात्काराच्या प्रकरणात पीडितेस मोफत कायदेशीर मदत मिळण्याचा अधिकार आहे .

* कोणत्याही महिलेस चौकशीकरिता पोलीस स्टेशनला बोलावल्या जाऊ शकत नाही, त्या महिलेची चौकशी घरीच आणि महिला पोलीस सोबत असताना करावी लागते  . 

* गंभीर गुन्हा असल्याशिवाय सूर्यास्तानंतर महिलेला अटक करता येत नाही. 

*कामाच्या ठिकाणी महिला व पुरुष कर्मचार्‍यांना समान वेतनाचा अधिकार आहे .

* गरोदर असल्यामुळे महिला कर्मचार्‍याची कमावरून हकालपट्टी करता येत नाही .

* महिलांना कोणत्याही हॉटेलमध्ये कोणत्याही वेळी पिण्याच्या पाण्याची मागणी करता येते.

* महिला कुठल्याही हॉटेलचे वाशरूम वापरू शकते. त्यांना नकार देता येत नाही.

* सार्वजनिक ठिकाणी जोडीदारस मिठी मारणे , कीस करणे हा गुन्हा नाही.  

 शेअर करून महिलांना त्यांच्या अधिकाराबद्दल जागृत करा .

Sunday, December 13, 2020

द  हर्षद मेहता : 1992 scam (भारताच्या अर्थव्यवस्थेमधील वादळ)



आजपर्यंत आपल्या देशात खूप मोठ मोठे घोटाळे झाले आहेत . विजय माल्ल्या, नीरव मोदी ,2G spectrum , commonwealth game, अशा खूप प्रकारचे घोटाळे उघडकीस आले. पण आजचा लेख हा आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये वादळ आणलेल्या घोटाळ्याबद्दल पाहणार आहे.  नेमका हा घोटाळा काय आहे आणि कसा झाला ते आपण सविस्तर पाहुया.

हा येवढा मोठा घोटाळा फक्त एक व्यक्ती घडून आणन ही अशक्य गोष्ट आहे. यामध्ये पूर्ण सिस्टमचा हात होता तरी सुद्धा यामध्ये एकाच व्यक्तिच नाव पुढे येते “हर्षद मेहता”. तर चला आधी पाहुया हर्षद मेहता बद्दल.  हर्षद मेहताचा जन्म 29 जुलै 1954  मध्ये गुजराती कुटुंबामध्ये झाला. कॉमर्स मध्ये डिग्री घेतल्यानंतर त्यानी खूप ठिकाणी नोकरी केली पण त्यातुन त्याला पाहिजे तेवढे इनकम नव्हते मिळत त्यामुळे नंतर तो  शेअर मार्केट कडे वळला. त्यानी ब्रोकरेज हाऊस मध्ये नोकरी कारायला सुरुवात केली. तो ही नोकरी शेअर मार्केट शिकण्यासाठी करत होता. त्यानंतर तो स्वतः शेअर मार्केट मध्ये इनवेस्ट कारायला लागला  पण त्यामध्ये त्याला खूप नुकसान झाल आणि इथून त्याचा खरा प्रवास सुरू झाला. 1884 मध्ये त्यानी Grow More research म्हणून स्वतःची कन्सलटंसी कंपनी सुरू केली. ही कंपनी कस्टमरला शेअर मार्केट सर्विस देत होती. 1990 पर्यत कंपनीची खूप ग्रोथ झाली होती आणि  हर्षद मेहताच नाव पण मोठ झाल होत. त्याला शेअर मार्केट मधला अभिताभ बच्चन आणि बिग बुल म्हनायला लागले, तो जो शेअर  म्हणेल त्या  शेअरची किमंत वाढायची ,आणि काही दिवसातच त्यानी शेअर मार्केटची किमंत खूप वर नेली. नेमक तो हे कस करायचा हे सर्वांना विचार पडला असेल.  त्याला जर एखाद्या कंपनीच्या शेअरची किमंत वाढवायची असेल तर हा पठ्ठ्या त्या कंपनीचे खूप प्रमाणात शेअर विकत घ्यायचा आणि त्याच्या सर्व कस्टमरला पण तो शेअर विकत घ्यायला सांगायचा. त्याचबरोबर तो त्याच्या ओळखीच्या सर्व ब्रोकर आणि ब्रोकरेज हाऊसला पण विकत घ्यायला सांगायचा. कारण त्यावेळेस शेअर मार्केट म्हटल तर फक्त हर्षद मेहता ही व्याख्या झाली होती. अशाप्रकारेच त्यानी ACC या कंपनीचा शेअर २०० रु. वरुन ९००० रु. पर्यंत नेला तो पण खूप कमी वेळात . आता महत्त्वाची गोष्ट अशी की एखादया शेअरची अचानक येवढी किमंत वाढवायची तर पैसे पण तसेच लागतील तर तो त्यासाठी त्या कंपनी सोबत हात मिळवायचा आणि तिथून फंड जमा करायचा आणि अशाप्रकारे शेअरची किमंत वाढवायचा. त्याचबरोबर तो बँक साठी ब्रोकर म्हणून काम करायचा. आणि इथूनच खरा घोटाळा सुरू होतो.



हर्षद मेहता हा दोन बँकमधला मध्यस्थी म्हणून काम करायचा , जर एखादया बँकेला पैसाची आवश्यकता  असेल तर तो दुसर्‍या बँक कडून १५ दिवसासाठी  पैसे घेऊन त्या बँकला द्यायचा याला ready forward deal म्हणतात. यामध्ये पैसे देणारी आणि पैसे घेणारी बँक यांना एकमेकांबद्दल काहीही माहीत नसायच.सर्व काही ब्रोकर हॅंडल करायचा. पैसे देणारी बँक ही १५ दिवसासाठी पैसे ब्रोकरला द्यायची आणि नंतर ब्रोकर ज्या बॅंकला पैसाची गरज आहे त्या बँकला द्यायचा त्याऐवजी बँकेला BR (bank receipt) किंवा bank securities पैसे देणार्‍या बॅंकला द्यावे लागत . १५ दिवसांनंतर ब्रोकर व्याजासोबत पैसे बँकला वापस करायचा. पण इथे हर्षद मेहता बँकेला फेक BR देऊन  बँक कडून पैसे घ्यायचा आणि शेअर मार्केट मध्ये इनवेस्ट करायचा. SBI सोबत हाच प्रकार घडला. त्यावेळेस बँक ह्या कम्प्युटराइज नव्हत्या सर्व काम लेखी असायचे,SBI मध्ये ५०० करोड रु रजिस्टरमधून गायब होते. हा पूर्ण घोटाळा १९९२ मध्ये पत्रकार  सुचेता दलाल यांच्या आर्टिकलमुळे उघडकीस आला. हा घोटाळा उघडकीस येताच जे मार्केट सेंसेक्स एका वर्षात २५०० वरुन ४५०० पर्यंत पोहचले होते ते पुन्हा २५०० वर येऊन पोहचले. या मध्ये ३०००-४००० करोड नुकसान हे फक्त बँकांचे होते. सर्वात जास्त नुकसान यामध्ये शेअर मार्केटचे झाले,त्यावेळेस शेअर मार्केट मध्ये इनवेस्टमेंट केलेले लाखो लोक कंगाल झाले . कित्तेक लोकांनी आपले आयुष्य संपवून घेतले . जळवळपास हा पूर्ण घोटाळा १४००० -१५००० करोड पर्यंत होता . या घोटाळ्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला.

  लेख आवडला असेल तर नक्की लाइक आणि शेअर करा.

Saturday, December 5, 2020

आई सारखे दुसरे दैवत नाही ........!!!

आई या शब्दात फक्त दोनच अक्षरे आहेत .पण या दोन अक्षरामध्ये संपुर्ण ब्रम्हण्ड समावले आहे.आईच्या ममतेपुढे सर्व जगाचे प्रेम फिके पडते. सर्व दैवतात आई हे दैवत थोर आहे .आई याविषयावर बोलायला शब्द कमी पडतील. आई या शब्दाचा खरा अर्थ फोटो कडे पाहता क्षणी समजतो.👇👇👇👇👇


     फोटोमधल्या आईचे निस्वार्थ  प्रेम पाहून  कवि यशवंत यांच्या कवितेतील ओळी आठवल्या......
                              "स्वामी तिन्ही जगाचा ,आईविना भिकारी ..........!"

 फोटोमधल्या निरागस बाळाकडे पाहण्याची आणि त्याला जवळ घेण्याची इच्छा त्याच्या आईशिवाय कोणाचीच नाही होणार. म्हणून तर आई ही ईश्वरपेक्षा श्रेष्ठ ठरली.आई ही तिच्या मुलासाठी काहीपण करू शकते. आयुष्यात कितीही संकट आले तरी ती पर्वतासारखी खंभीर उभी असते.हजार जन्म घेतले तरी  तिच्या एका जन्माचे वृण फिटणार नाही.
"जगात असे एकच न्यायालय आहे तिथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आई".
 ज्याला आई नाही तोच सांगू शकतो आई नसल्याचे दुःख. आईची जागा कोणीच भरून काढू शकत नाही . एकदाची आई ही आईवडील दोघांची कर्तव्य पार पाडेल पण तिच्या मायेची भर दुसरी कोणतीच व्यक्ती नाही भरून काढू शकत.

खरच आपण सर्व खूप भाग्यवान आहोत आपल्याला तिच्या कुशीची ऊब आणि पदराची सावली मिळाली. तिच्या या प्रेमाचे पांग तर कोणत्याच जन्मात आपण फेडू नाही शकणार पण तिची सेवा करून तिचा आशीर्वाद नक्कीच घेऊ शकतो.

जग कितीही बदलत जात असेल पण आई आणि तिचे प्रेम हे कधीच बदलू शकणार नाही . पण आताच्या पिढी मध्ये प्रेम सोडून काही गोष्टी मध्ये बदल झाला आहे , तंत्रज्ञानमुले काही गोष्टी बदलत जात आहेत. आधीच्या काळात बाळ रडल तर त्याला कुशीत घेऊन गाण म्हणून शांत कारायचे आणि आता बाळ रडल तर त्याच्या हातात मोबाइल देऊन द्यायचा आपोआप तो रडण बंद करून शांत होतो . आधी बाळ जेवायला तयार नसेल तर त्याला काउउ आला...चिऊ आला म्हणून भरवायचे पण आता मोबाइल हातात दिल्या शिवाय जेवनच करत नाही . बालपणी संस्कार खूप महत्त्वाचे आहेत तेच कुठे तरी बदलत आहेत . फक्त हे संस्कार  देण्यामध्ये बदल नका होऊ देऊ . 

 लेख आवडला असेल तर नक्की लाइक आणि शेअर करा.