आई या शब्दात फक्त दोनच अक्षरे आहेत .पण या दोन अक्षरामध्ये संपुर्ण ब्रम्हण्ड समावले आहे.आईच्या ममतेपुढे सर्व जगाचे प्रेम फिके पडते. सर्व दैवतात आई हे दैवत थोर आहे .आई याविषयावर बोलायला शब्द कमी पडतील. आई या शब्दाचा खरा अर्थ फोटो कडे पाहता क्षणी समजतो.👇👇👇👇👇
फोटोमधल्या आईचे निस्वार्थ प्रेम पाहून कवि यशवंत यांच्या कवितेतील ओळी आठवल्या......
"स्वामी तिन्ही जगाचा ,आईविना भिकारी ..........!"
फोटोमधल्या निरागस बाळाकडे पाहण्याची आणि त्याला जवळ घेण्याची इच्छा त्याच्या आईशिवाय कोणाचीच नाही होणार. म्हणून तर आई ही ईश्वरपेक्षा श्रेष्ठ ठरली.आई ही तिच्या मुलासाठी काहीपण करू शकते. आयुष्यात कितीही संकट आले तरी ती पर्वतासारखी खंभीर उभी असते.हजार जन्म घेतले तरी तिच्या एका जन्माचे वृण फिटणार नाही.
"जगात असे एकच न्यायालय आहे तिथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आई".
ज्याला आई नाही तोच सांगू शकतो आई नसल्याचे दुःख. आईची जागा कोणीच भरून काढू शकत नाही . एकदाची आई ही आईवडील दोघांची कर्तव्य पार पाडेल पण तिच्या मायेची भर दुसरी कोणतीच व्यक्ती नाही भरून काढू शकत.
खरच आपण सर्व खूप भाग्यवान आहोत आपल्याला तिच्या कुशीची ऊब आणि पदराची सावली मिळाली. तिच्या या प्रेमाचे पांग तर कोणत्याच जन्मात आपण फेडू नाही शकणार पण तिची सेवा करून तिचा आशीर्वाद नक्कीच घेऊ शकतो.
जग कितीही बदलत जात असेल पण आई आणि तिचे प्रेम हे कधीच बदलू शकणार नाही . पण आताच्या पिढी मध्ये प्रेम सोडून काही गोष्टी मध्ये बदल झाला आहे , तंत्रज्ञानमुले काही गोष्टी बदलत जात आहेत. आधीच्या काळात बाळ रडल तर त्याला कुशीत घेऊन गाण म्हणून शांत कारायचे आणि आता बाळ रडल तर त्याच्या हातात मोबाइल देऊन द्यायचा आपोआप तो रडण बंद करून शांत होतो . आधी बाळ जेवायला तयार नसेल तर त्याला काउउ आला...चिऊ आला म्हणून भरवायचे पण आता मोबाइल हातात दिल्या शिवाय जेवनच करत नाही . बालपणी संस्कार खूप महत्त्वाचे आहेत तेच कुठे तरी बदलत आहेत . फक्त हे संस्कार देण्यामध्ये बदल नका होऊ देऊ .
लेख आवडला असेल तर नक्की लाइक आणि शेअर करा.
सुरवात खूपच छान,
ReplyDeleteआई,
म्हणजे काय ?
याचे सगळ्यात सोपे उत्तर आहे,
घरातल्या घरात गजबजलेल् छोटंसं गाव....
सरतही नाही , उरतही नाही.....
Thank u...😄
Deleteअप्रतीम
ReplyDelete